काय लिहावं बरं? खूप दिवस झाले चिवित्रयानवर काही विचार मांडून. सतत वाटतं की तुम्ही हे page like केले आहे म्हणजे तुमच्याकरिता काहीतरी पोस्ट करणे हे तर माझे प्रथम कर्तव्यच आहे ना! परंतु मी काही script-writer नाही, आणि म्हणूनच मला ठरवून लिहिता येत नाही. मी बापडा, सरळ, साधा आणि मुख्य म्हणजे मनस्वी माणूस. बापरे जास्तच होतंय का जरा? ;) पण मनस्वीपणा तनामनात रुजलेला. आणि म्हणूनच मनाला काही भावलं, रुचलं आणि तुमच्यासमोर मांडावे तरच बोट चालतात माझी. हो बोट चालतात असंच म्हणालो मी. आता लेखणी झरते, शब्द कागदावर आपोआप उतरू लागतात वगैरे अलंकारीक लिहिताच येत नाही. सगळा संगणकावरील बटणांचा खेळ. वळणदार हस्ताक्षर लोप पावले अगदीच. इतक्यात कोणी कोणाला स्वतःच्या हाताने पूर्वीप्रमाणे पत्रं लिहिल्याचे ऐकिवात नाही. पूर्वी कसे अक्षरावरूनच ओळख पटायची, ती पत्रं अक्षरश: काळजाशी धरता यायची. आपुलकीचा सुगंध असायचा पत्रांना. लिखाणाच्या पद्धत, टापटीप, अक्षराचे वळण वगैरे घटकांवरून पत्र लिहिणाऱ्या व्यक्तीच्या भावनांचा पक्का अंदाज बांधता यायचा. आता मात्र नुसतीच बटणांची टकटक, किंबहुना touchpad असल्यामुळे ते ही न...