।। नांदी ।।

अनियमित नि असुरक्षित अशा आयुष्यत सुसूत्रता नि सुरक्षितता आणण्याकरिता माणसाने समाज निर्माण केला. अर्थातच चाकोरी म्हटल की नियम आले, ठराविक वेळी ठराविक पद्धतीनेच वागण्याची सक्ती आली...

... नि हळुहळु माणसा अंगी असलेला नैसर्गिक निरागस मोकळेपणा लोप पावत गेला. नि स्वत:च्या भावना मनाला वाटेल तेव्हा व्यक्त करणे हा वेडेपणा किम्बहुना "विचित्रपणा"त गणला जाऊ लागला.

     तेव्हा हुक्की येईल तेव्हा नि स्व-इच्छेनुसार स्वत:ला व्यक्त करण्याचा "चिवित्र"पणा करण्यासाठी खास या ब्लॉगची निर्मिती केली आहे.

तर मग इथे मज़कुर प्रकाशित करणे हे देखील सर्वस्वी मन देवतेच्याच लहरीवर अवलंबून नाही का? :)

 - आपला आणि आपल्यातला चिवित्र...!

Comments