|| Appraisal Letter ||

मागील आठवड्यात, त्याला appraisal letter मिळाले. त्याला जी अमुक टक्के पगारवाढ मिळाली त्याबद्दल त्याला ना आनंद होता ना दुःख. प्रथमदर्शनी मनात विचार आला की बरी आहे आपल्या पगाराच्या मानाने. ठीक आहे. Let's move on!
घरी गेल्यावर त्याने जेंव्हा बायकोला सांगितलें, तेंव्हा ती म्हणाली एवढीच? वर्षभर तू जे राब राब राबलास, वेळी अवेळी अगदी सणावाराला देखील जे client calls घेतलेस, काम केलेस त्याचा इतकाच मोबदला. सुरुवातीला फार काही बोलला नाही तो, पण मनातकुठेतरी कळ उमटली.तो तिला समजावण्याच्या सुरत म्हणाला अगं पण ठीकठाक आहे ना मग झालं तर. तिला काही पटलं नाही ते . चल जेवून घेऊयात असे म्हणून त्याने पटकन विषय बदलला. म्हटले उगाच डोक्यात किडा नको.
पुढच्या दोन-चार दिवसात ऑफिस मधल्या सहकाऱ्यांशी बोलता बोलता कळाले कि अमक्या तमक्याला चांगलं मिळालाय appraisal आणि तमकीला तर promotion पण मिळालाय. ह्या विषयावर चवीने चर्चा होत राहिली. डोक्यात कुठेतरी तुलना नावाचा राक्षस जन्माला आला आणि तो स्वतःची तुलना इतरांशी करू लागला. तेंव्हा वाटले कि आपले जर ठीक आहे तर मग इतरांचे काय? त्यांना तर चांगलीच मिळाली आहे ना? तुझ्याशी तुलना करता त्यांनी फार काही काम न करतादेखील त्यांना चांगलीच मिळाली आहे increment, नाहीच तर promotions तरी मिळाली, तुझे काय?
तो अस्वस्थ झाला अगदी आतून, कामात लक्ष लागेना. कामाची सवय असल्याने मेंदू व्यवस्थित काम करवून घेत होताच पण त्यामध्ये नेहमीचा तो नव्हता. जिकडे पहावे तिकडे त्याला आपल्यापेक्षा चांगलं appraisal झालेले लोक दिसू लागले आणि त्याच्या दुःखात भर पडतच राहिली. आपण बॉस शी जाऊन कचाकचा भांडावे कि काय इथपासून अगदी organization बदलावी की काय; असे विचार त्याच्या डोक्यात थैमान घालू लागले. मेंदू त्याला सतत सांगत होताच की अरे तू ह्या निरर्थक गोष्टींमध्ये अडकून राहण्यापेक्षा तुझ्या कामाकडे आणि स्वतःच्या priorities कडे लक्ष दे. मेंदूला हे कळात होतंच पण मनाला हे कोणी समजवावे?
आजही तो ऑफिस ला आला होता अगदी निरुत्साही. काम फारसे नव्हते तरीही मनाने थकलेला होता. तेवढ्यात दुसऱ्या ऑफिसमधील एका colleague किंबहुना मैत्रिणीचा त्याला फोन आला. मागच्या आठवड्यात तिच्याशीही वळला होता तो या बाबतीत, तीही खूपच निराश झाली होती बिचारी. तो आपली व्यथा तिच्यासमोर मांडायला लागाला अगदी आपसूकच
तो: अगं कळतंय पण वळत नाही अशी अवस्था झालीये माझी. हा अनाठायी ताण नको आहे मला. मी काय करू?
ती: नको विचार करुस जास्त, सोडून दे .
तो: अगं पण असं सोड म्हणून सुटत असते विचार. तर प्रत्येक माणूस सुखी नसता का?
ती: अगदी खरं आहे रे, पण हा बिनकामाचा ताण आणि निराशा... It’s not worth it यार! (त्याच्या मनात लख्खकन काहीतरी चमकलं). हे निरर्थक ओझं तुझ्या उरावर तूच ठेवून घेतलं आहेस. इतर कोणी नाही. कोणाशीहि व्यर्थ तुलना करण्यामागे काय तर्कसंगती आहे? प्रत्येकाची क्षमता, परिस्थिती आणि नशीब हे वेगळे असते.
त्याला पटकन स्वानंद आठवला. परवाच तर त्याला उकृष्ट काम केल्याबद्दल मागील वर्षीचा 'Best Employee' पुरस्कार मिळालाय. आणि हे सगळं त्याला अगणित कौटुंबिक समस्या असताना देखील शक्य करून दाखवलय त्याने.
ती: अरे तु खूप छान व्यक्ती आहेस आणि तुझे छान त्रिकोणी कुटुंब आहे तेंव्हा स्वतःकडे, कुटुंबाकडे लक्ष दे, तुझे काम चोख ठेव आणि जगायला लाग. आयुष्य म्हणजे केवळ काही टक्के मिळालेली पगारवाढ नव्हे. Remember, all of this stress is not worth it! Leave it behind & be Happy! आणि हे केवळ तुझ्याच हातात आहे बरं का! 
तो निःशब्दच होता बराचवेळ. तिचे मनापासून आभार मानून फोन ठेवला त्याने. पण तिचे शब्द डोक्यात घुमत राहिले. गेले दोन आठवडे काळवंडलेलं त्याच्या मनाचे आभाळ आज ह्या शब्दसरींनीं न्हाऊन निघालं, स्वच्छ झालं. त्याच्या चेहऱ्यावर नकळत हसू फुटलं. सवयीने त्याने बाह्या मागे सारल्या आणि तो उत्साहाने कामाला लागला.
- चिवित्र

Comments

Post a Comment