Posts

Showing posts from January, 2020

कातरवेळ...

Image
संध्याकाळी साडे सहाची वेळ. पाणी प्यायला जाता जाता अनपेक्षितपणे मनाच्या पटलावर 'भय इथले संपत नाही' चे मृदू सूर उमटले आणि तो चमकला. सकाळपासून ऑफिसच्या कामात स्वतःला गाडून घेतले होते त्याने. अगदी कशाची म्हणून शुद्ध नव्हती. अचानक असे काही होईल ह्याची त्याला काडीमात्र कल्पना नव्हती. कैक वर्षांपूर्वी दूरदर्शन वर लोकप्रिय असलेली 'महाश्वेता' मालिका डोळ्यांसमोर तरळली आणि लता दीदींचा मंजुळ स्वर कानात घुमला. तशी त्याची पावले थबकली. लगोलग पाण्याची बाटली भरून पुन्हा कामाला लागण्याऐवजी तो Cafeteria मध्येच थांबला. खिशातून मोबाईल बाहेर काढून ते गाणे इंटरनेटवर शोधले आणि मोबाइल स्पीकर वर ठेऊन '...मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गिते...' ऐकत तिथेच आसनस्थ झाला. हातातला ग्रीन टी चा कप जागेवर थिजला आणि त्याचा चेहरा क्षणभर उजळला. येणारे जाणारे त्याच्याकडे विचित्र नजरेने पाहात निघून जात होते, तो मात्र डोळे मिटून हरवलेला दूर कुठेतरी हरवलेला... आयुष्य वाळूप्रमाणे हातातून भराभरा निसटून चालले आहे, खूप काही घडत आहे, सतत व्यस्त असूनही आयुष्यात कुठेतरी मोठ्ठी पोकळी निर्माण झाल्या...