ऑफीस मधल्या थंडगार एसी मधे बसून, मी काचेपलीकडे मुक्त बरसणारा पाउस पाहतो, तेव्हा आपसूकच तू आठवतेस मला... पहिल्या पावसात चिंब भिजलेली........ काचेवरून ओघळणारे थेंब जणू काही तुझ्या गुलाबी गालावरूनच ओघळताहेत, असा उगाचच भास होतो. डोळ्यांनी स्पष्टपणे दिसत असता देखील हातात येत नाहीत ते, अन् ओघळून जातात आपल्या नात्यातल्या अदृश्य काचेपलीकडून.. निमूटपणे... माझ्या कोरड्या मनावर त्याचेही ओले ओरखडे उमटतात... तुला एकच सांगणे आहे, कधीतरी अचानक ये आणि मुक्तपणे बरसू न जा... माझ्या कोरड्या मनावर! ठाउक आहे मला, ह्यावेळी देखील तू माझ्या हाती लागणार नाहिसच.... हातातून निसटणार्या वाळूप्रमाणे... पण तुझे मुक्त बरसणे मनात साठून राहील. तेवढी ठेव पुरेल मला... तू पुन्हा भेटेपर्यंत...... तुझा चातक. N.B. मग मधली कॉफी संपली आहे आणि मीटिंग ची वेळ देखील झालीय..... भेटत जा अशीच कधीतरी....... निदान आठवणींमधून......
Comments
Post a Comment