|| आभाळ काळवंडलेले ||
तुडुंब भरलेल्या मनाच्या तळ्यावर
तू भिरकावतेस एक रुक्ष कटाक्ष,
तरंग उठतात लगोलग मिश्र भांवानांचे
नि ढवळून जातो मी, अगदी आतून...
तुडुंब भरले असल्या कारणाने
प्रत्येक तरंगासवे ओघळतात भावना
डोळ्यांच्या कडा ओलावत झिरपत जातात,
विरून जातात...हृदयाशी पोचण्याअगोदर ...
तुझा एक रुक्ष कटाक्ष, ती कोरडी नजर
त्यापेक्षा तू बरसून का नाही जात?
होऊ देत विजांचा कडकडाट, लखलखाट
होरपळून जाईन मी, कदाचित उजळूनही निघेन…!
नुसतेच मेघ दाटून ,मनीचे आभाळ काळवंडून ,धुमसत राहण्यापेक्षा, बरसलेले केंव्हाही चांगलेच, नाही का?
Comments
Post a Comment